म्हणाली ‘जड अंतःकरणाने मी हे जाहीर करते..’, असं कंगनाने म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणारा कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रामुळे अडकला आहे. चित्रपट निर्मिती कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण तेथेही त्यांची निराशा झाली. कंगना राणौतच्या ( Kangana Ranaut ) ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाविरोधात देशातील अनेक ठिकाणी शीख संघटना आंदोलन करत आहेत.
या चित्रपटाविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिने आज म्हणजेच शुक्रवारी ही घोषणा केली. कंगनाच्या म्हणण्यानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून प्रलंबित प्रमाणपत्रामुळे चित्रपटाच्या रिलीजला उशीर होत आहे.
कंगना रणौतने तिच्या अधिकृत X खात्यावर लिहिले की, मी जड अंतःकरणाने जाहीर करते की माझा दिग्दर्शित चित्रपट ‘इमर्जन्सी’ पुढे ढकलण्यात आला आहे. आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत. नवीन प्रकाशन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तुमच्या समजूतदारपणाबद्दल आणि संयमासाठी धन्यवाद.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App