विशेष प्रतिनिधी
मनाली : कंगना राणावत या प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून कंगनाला ही धमकी देण्यात आली आहे.
Kangana Ranaut threatened to kill on social media
कंगना ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती सतत वादग्रस्त वक्तव्य करत असते. तसेच तिच्या ट्विटसमुळे पण ती कायम चर्चेत असते. तिने आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे अशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे व धमकी देणाऱ्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
कंगना रनौटची गांधीजींवर टीका, त्यांच्या मार्गाने स्वातंत्र्य नव्हे तर भिकच मिळते
कंगनाने मनाली पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणाऱ्याविरुद्ध फिर्याद दिली. तिने पोलिसांना सांगितले की सोशल मीडियावर एका व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कुलुचे पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा म्हणाले की, “कंगनाने मनाली पोलीस स्टेशनमध्ये सदर तक्रार केली आहे. या तक्रार पत्रात सोशल मीडियावर तिला एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे नमूद केले आहे.” आय पी सी कलम २९५अ ५०४, ५०५, ५०६, ५०९ अंतर्गत पोलीसांनी सदर प्रकरण प्रविष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App