विशेष प्रतिनिधी
कामेंग : अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जिल्ह्यातील कामेंग नदी मधील पाणी अचानक काळे झालेले आढळून आले आहे. आणि या पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू होऊन नदीकाठी मृत माशाचे ढीग साचून राहिले आहेत.
Kameng river in Arunachal Pradesh suddenly turned black! Thousands of fish died! Locals say China is to blame
जिल्हा अधिकार्यांनी केलेल्या परीक्षणानुसार, पाण्यामध्ये विरघळून जाणाऱ्या घन पदार्थांचे (Total Dissolved Substances) प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. या अधिक प्रमाणामुळे माशांना श्वसनाचे त्रास आणि व्हिजिबिलिटी चा प्रॉब्लेम होऊन त्यांचा मृत्य झाला असण्याची शक्यता आहे.
300 ते 1200 मिलिग्रॅम पर लिटर ही नॉर्मल पाण्यामध्ये असणार्या घन पदार्थांचे प्रमाण आहे. पण कामेंग नदी मध्ये हे प्रमाण 6800 मिलिग्रॅम पर लिटर इतके आहे. जे अतिशय जास्त आहे असे मत्स्य विकास अधिकारी हॅली ताजे यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशापाशी चीनी लष्कराच्या वाढत्या हालचाली, भारताचीही पुरेपूर सज्जता
तेथील रहिवाशांनी या सर्व गोष्टींना चीनला कारणीभूत ठरवले आहे. जवळ चालू असणाऱ्या कन्स्ट्रक्शनमुळे हा प्रकार झाला असे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी साठलेले मासे न खाण्याची सूचना केलेली आहे.
अरुणाचल प्रदेशमधील विवादित सीमेपलीकडील संवेदनशील भागांमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वाढत्या हालचालींवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. लष्कराने लुंग्रो ला, झिमिथांग आणि बम ला या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भागांमध्ये चायनाच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली प्रचंड वाढल्या होत्या. असे हिंदुस्थानी टाईम्सने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
भारताकडून उपग्रह तसेच लांबपल्ल्याच्या मानवरहित हवाई वाहने, रडार नेटवर्क, हाय टेक्नॉलॉजी नाइट व्हिजन सिस्टीम यांचा वापर करून चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यावरून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रमाच्या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले होते असे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे बुलडोझरमुळे वाहनांच्या हालचाली देखील वाढलेल्या आहेत. असे हिंदुस्थान टाइम्सने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App