कल्याण सिंग जातीपातींच्या पलीकडचे देशाचे नेते; आम्ही एकत्र पोलिसांच्या लाठ्या आणि गोळ्या झेलल्यात; डॉ. मुरली मनोहर जोशींच्या भावना


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या बरोबर कल्याण सिंग यांचे घनिष्ठ संबंध होते. त्या पैकी एक अत्यंत निकटवर्ती नेते भाजपचे माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी कल्याण सिंग यांच्या आठवणी जागवल्या आहेत. कल्याण सिंग यांच्या निधनानंतर त्यांना भावना अनावर झाल्या.Kalyan Singh is a leader of a country beyond caste; We caught police batons and bullets together; Dr. Emotions of Murli Manohar Joshi

ते म्हणाले की, कल्याण सिंग एका जातीपुरते मर्यादित नेते नव्हते. त्यांचे समाजातल्या तळागाळापर्यंत काम होते. समाजातल्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी त्यांनी अविरत कष्ट उपसले. ते संपूर्ण देशाचे नेते होते. रामजन्मभूमी आंदोलनात आम्ही जुलमी राजवटीच्या लाठ्या आणि गोळ्या झेलल्या आहेत.



त्या जुलमी राजवटीवर हातात हात घालून एकजुटीने मात केली आहे. कल्याण सिंग यांचे राम जन्मभूमी आंदोलनातले योगदान मी कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दांत डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी कल्याण सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हेच डॉ. मुरली मनोहर जोशी आहेत, ज्यांनी कल्याण सिंग यांना उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची युती करून भाजपने सत्ता मिळवावी यासाठी राजी केले. बहुजन समाज पक्ष अशी युती करून भाजप आपला पाया विस्तार करू शकेल हे त्यांना पटवून दिले. कल्याण सिंग यांनी मोठ्या मनाने त्याला मान्यता दिली.

त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे छोटे-मोठे दौरे करून भाजपचा विस्तार केला. कल्याण सिंग यांनी, “लाठी नही चलऊंगा गोली नही चलाऊंगा”, हे सुप्रीम कोर्टात दिलेले आश्वासन पाळले. याची सर्वांना माहिती आहे. परंतु ही 1992 च्या डिसेंबर मधील कारसेवेच्या वेळेची घटना आहे.

त्याच्या आधी सहा महिने जुलै 1992 मध्ये त्यांच्या सरकारने रामजन्मभूमी परिसरात काम सुरू केले होते. त्याला डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पाठिंबा होता. या दोन्ही नेत्यांनी मिळून राम मंदिर परिसरात काम सुरू करण्यासाठी अयोध्येचे दौरे केले. वातावरणनिर्मिती केली. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ते काम थांबवावे लागले.

तरीही या दोन नेत्यांनी राम जन्मभूमी आंदोलन केले. आपली भूमिका पातळ केली नाही. दोघांमधली ही राजकीय मैत्री त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती, अशी आठवण प्रख्यात राजकीय इतिहासकार विनय सीतापती यांनी त्यांच्या ताज्या जुगलबंदी या पुस्तकात लिहिली आहे.

माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यातील राजकीय संबंधांवर आणि राजकीय वाटचालीवर जुगलबंदी हे पुस्तक आहे. त्यामध्ये रामजन्मभूमी संदर्भात कल्याण सिंग यांच्या योगदानाचा गौरव पूर्ण उल्लेख आहे.

Kalyan Singh is a leader of a country beyond caste; We caught police batons and bullets together; Dr. Emotions of Murli Manohar Joshi

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात