दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या हायप्रोफाइल नेत्यांपैकी के कविता या एक आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बीआरएस नेत्या कविता यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. मुलाच्या परीक्षेबाबत त्यांनी जामीन मागितला आहे. सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या नियमित जामीन अर्जाला 20 एप्रिलला सुचीबद्ध केले आहे.K Decision reserved on Kavita’s interim bail application ED opposition
मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्रीय समितीच्या नेत्या कविता यांनी दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. कविता आणि ईडीच्या वतीने बाजू मांडल्यानंतर राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी निर्णय राखून ठेवला आहे.
के कविता यांच्या वतीने न्यायालयात हजर झालेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, के कविता यांना पीएमएलएच्या कलम ४५ नुसार जामीनही मिळावा. तर अंमलबजावणी संचालनालयाने कविताच्या जामिनाला विरोध केला आहे.
कविता यांना 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी EDने हैदराबादमधील त्यांच्या घरातून अटक केली होती. अनेक तासांच्या चौकशी आणि छाप्यांनंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या हायप्रोफाइल नेत्यांपैकी के कविता या एक आहेत. याशिवाय अन्य नेतेही तुरुंगात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App