महाराष्ट्रापाठोपाठ हरियाणातही काँग्रेसला धक्का; प्रख्यात उद्योगपती नवीन जिंदाल भाजपमध्ये दाखल!!

joining the BJP, Former Congress MP Naveen Jindal

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची कितीही तयारी चालवली असली, तरी प्रत्यक्षात पक्षातून होत असलेली गळती थांबवण्यात त्यांना यश येताना दिसत नाही. काँग्रेसला आज एकापाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. joining the BJP, Former Congress MP Naveen Jindal

महाराष्ट्रात विदर्भातले काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर त्यानंतर काही वेळातच उद्योगपती नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

राजू पारवे हे विदर्भातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

नवीन जिंदाल हे प्रख्यात जिंदाल उद्योग समूहाचे अध्यक्ष असून ते काँग्रेस पक्षाचे हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून दोन टर्म खासदार होते. त्यांनी सायंकाळी काँग्रेसचे नेतृत्व आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काही वेळातच भाजप मुख्यालयात आले आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवीन जिंदाल यांच्यासारख्या वरिष्ठ उद्योगपतीच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला हरियाणामध्ये बळ मिळाले आहे.

joining the BJP, Former Congress MP Naveen Jindal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात