वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावरुन सजग झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकर भरतीचा मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार येत्या 18 महिन्यांत विविध सरकारी खात्यांमध्ये 10 लाख लोकांची नोकर भरती करण्यात येणार आहे.Job opportunities: PM Modi’s mega plan; Government job opportunities; Recruitment of 10 lakhs in 18 months !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालयांशी संलग्न असलेल्या मनुष्यबळ खात्यांची आणि त्यातल्या मनुष्यबळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये येत्या 18 महिन्यांमध्ये विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेली पदे भरणे बरोबरच नवीन पदांची निर्मिती करून ती देखील भरण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधक कायम पंतप्रधानांवर बेरोजगारीच्या मुद्द्यावर निशाणा साधत असतात. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विविध मंत्रालयाची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना रिक्त पदे भरण्याचे आणि नवीन पदे निर्माण निर्मित करून ती देखील भरण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांना पत्र लिहिले असून आपापल्या खात्यांमधली नोकर भरती अधिक वेगाने सुरू करण्याची सूचना केली आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये विविध खात्यांमध्ये 10 लाख लोकांची भरती करण्याची ही योजना आहे.
विरोधकांचे टीकास्त्र
काँग्रेसने मात्र पंतप्रधानांच्या मेगा नोकरभरती प्लॅनवर शरसंधान साधले असून “नऊसौ चुहे खाकर बिल्ली चली हज को” असे टीकास्त्र रणदीप सुरजेवाला यांनी सोडले आहे, तसेच “भरती कहा करोगे? पागल खाने मे?”, असे ट्विट मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App