विशेष प्रतिनिधी
लखनऊ : जिनांच्या अनुयायांनी ऊसाच्या गोडीत कडूपणा मिसळला होता. मात्र आता उसाचे गोडवे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी जेवर विमानतळ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असा टोला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मारला आहे.Jinnah’s followers add bitterness to sugarcane sweetness, alleges Yogi Adityanath
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवर विमानतळाचे भूमीपूजन केले आहे. हे विमानतळ उत्तर प्रदेशला थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार आहे. यामुळे शेतकरी पालेभाज्या, फळे, मासे यासारख्या वस्तू विदेशात पाठवणे शक्य होईल. तसेच मेरठच्या पेठांना देखील विदेशी मार्केट मिळू शकणार आहे.
पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशला अनेक जण टोमणे लगवायचे. कधी गरिबीचे टोमणे, कधी घोटाळ्यांचे टोमणे, कधी खराब रस्त्यांचे टोमणे, कधी माफियांचे टोमणे. मात्र आता यूपीत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. यापूर्वी राजकीय फायद्यासाठी रेवड्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, याचा विचार कोणी करत नव्हता. गेली कित्येक वर्ष हे प्रकल्प रखडले होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, ऊसाच्य गोडीला आणखी गोडी मिळणार की जिनांच्या अनुयायांकडून देशाात दंगे होणार याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या लोकांकडून होणाºया खोड्या देश किती काळ सहन करणार? त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला आवाहन करावे यासाठीच येथे आलो आहे.
पुढील काळात नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि संपूर्ण यमुना क्षेत्रात प्रगती आणि विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. एक लाखाहून अधिक रोजगार तयार होणार आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App