वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब, राजस्थान आणि म्हाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्ये काँग्रेसमोर राजकीय संकट उभे राहिले आहे. दिल्ली येथे काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन गेले होते. पण, त्यांना भेटण्याची वेळच दिली नाही. त्यामुळे त्यांना हात हलवत राज्यात परतावे लागले आहे. Jharkhand there is a lot of controversy over cabinet expansion
झारखण्डमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मोर्चा आणि काँग्रेस यांचे सरकार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून तणाव आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सोरेन दिल्लीला सोनिया आणि राहुल गांधींना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची खातरदारी करण्यात गांधी माता, पुत्र गुंतले होते. त्यामुळे सोरेन यांना त्यांना भेटण्याची वेळ मिळाली नाही. अखेर ते हात हलवत माघारी परतले.
राज्यातील मंत्रिमंडळात सोरेन धरून ११ मंत्री आहेत. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे ५,काँग्रेस ४ आणि राजदचा एक मंत्री आहे. रिक्त मंत्रीपदाच्या १२ जागा भरण्यात येणार आहेत. जादा मंत्रीपदांसाठी काँग्रेस आणिझारखंड मोर्चाने दावा केला आहे. त्यासाठी काँग्रेसचा हट्ट आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री रामेश्वर आरोअन हे सुद्धा दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App