बाबुलाल मरांडी, चंपाई सोरेन, गीता कोडा… जाणून घ्या, कोणाला मिळाली संधी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 66 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या 66 उमेदवारांमध्ये भाजपने 11 महिलांना स्थान दिले आहे. भाजप राज्यात एकूण 68 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या यादीनंतर आता फक्त दोन जागा जाहीर होणे बाकी आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी हे धनवार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय सीता सोरेन जामतारा, चंपाई सोरेन सरायकेला आणि गीता कोडा जगन्नाथपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांचं मोठं वक्तव्य; जाणून घ्या, पंतप्रधान मोदींचे आभार का मानले?
ओडिशाचे राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून पूर्णिमा साहू यांना भाजपने जमशेदपूर पूर्व मतदारसंघासाठी तिकीट दिले आहे. अर्जुन मुंडा यांच्या पत्नीलाही तिकीट देण्यात आले आहे. मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा पोटकामधून निवडणूक लढवणार आहेत.
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि त्यांचा मुलगा दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेन यांना घाटशिला येथून तिकीट देण्यात आले आहे. चंपाई सोरेन सरायकेलामधून तर त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेन घाटशिलामधून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने कोडरमा जागेसाठी नीरा यादव, गंडेया जागेसाठी मुनिया देवी, सिंद्रीमध्ये तारा देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता आणि झरियामधून रागिणी सिंह यांना तिकीट दिले आहे. गीता बालमुच या चाईबासामधून तर पुष्पा देवी भुयान छतरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. गुमला विधानसभेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App