सुरज रेवण्णांना अटक केल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरु : जनता दल – धर्मनिरपेक्ष (जेडीएस) आमदार सूरज रेवन्ना यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. रविवारी कथित लैंगिक छळ प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोमवारी सूरज रेवण्णांच्या कोठडीसाठी न्यायालयात जाऊ शकतो. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे. सुरज रेवण्णांना अटक केल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे.JDS MLC Suraj Revanna’s trouble escalates, 14-day judicial custody
हसन पोलिसांनी रविवारी सकाळी सूरज रेवण्णांना अटक केली होती. शनिवारी एका 27 वर्षीय तरुणाने त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. सूरजवर आरोप करणारा तरुण हा पक्षाचा कार्यकर्ता आहे. रविवारी संध्याकाळी, पोलिसांनी सूरज रेवण्णाला बेंगळुरूमधील 42 व्या ACMM न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर हजर केले. यानंतर न्यायाधीशांनी जेडीएस आमदार सूरज रेवण्णांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
जेडीएस एमएलसी सूरज रेवण्णा हे प्रज्वल रेवण्णा यांचे भाऊ आहेत. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्याचे आरोप झाल्यानंतर त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रज्वल सध्या रेवण्णा तुरुंगात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App