जरांगे पाटलांचा इशारा, वडेट्टीवारांनी समाजाविरुद्ध बोलू नये, नाहीतर काँग्रेसच्या जागा पाडू!!

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा समाजाच्या विरोधात विरोधी पक्षनेते विजय‎वडेट्टीवार यांनी बोलू नये, अन्यथा विधानसभेला‎वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व जागा पाडून टाकू,‎अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी नवनिर्वाचित‎खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासमोरच काँग्रेस‎नेत्यांना इशारा दिला. त्यानंतर खासदार डॉ.काळे यांनी‎जरांगे पाटलासंमोरच काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ‎नेत्यांना फोन करून मराठा आंदोलनाविरोधात भाष्य‎करणे योग्य नसल्याचे सांगितले. सोमवारी जरांगे‎पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. शरीरातील‎पाणी कमी होत असल्याने त्यांची प्रकृती आता खालावत‎चालली असून उपचार घेण्यास जरांगे पाटलांनी ठाम‎नकार दिला आहे.‎Jarange Patal’s warning, Vadettivars should not speak against society, otherwise they will demolish Congress seats!!



आजपर्यंत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित ५‎खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या‎प्रकृतीची चौकशी केली. सोमवारी जालन्याचे खासदार‎डॉ. कल्याण काळे यांनी आंतरवालीत येऊन जरांगे ‎‎पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा समाजाला ‎‎ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका काँग्रेसचे नेते ‎‎विजय वडेट्टीवार यांनी घेतली. ते बोलत राहिले तर‎आम्ही वडेट्टीवार यांनाही पाडू, असा इशारा जरांगे‎पाटलांनी दिला. आम्ही मराठवाड्यातील कुणीच असे ‎‎बोलत नाहीत, परंतू विदर्भातील काही जण आणि ‎‎ओबीसींचे काही नेते यासंदर्भात बोलत आहेत. असे‎होऊ नये अशी अपेक्षा डॉ. काळे यांनी व्यक्त केली. ‎‎आमदार राजेश टोपे यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली.‎

मराठा समाजाच्या या‎ आंदोलनाला माझा पाठिंबा‎ राहील. जरांगे पाटील यांच्या‎ मागण्या शासन दरबारी मांडणार‎ आहे. निवडणुकीत जरांगे पाटील‎ यांच्या आंदोलनाचा शंभर टक्के‎ फायदा झाला. विरोधी पक्षनेते‎ विजय वडेट्टीवार हे जरांगे पाटील‎ आणि आंदोलनाच्या विरोधात‎ बोलले असतील तर ते चुकीचे‎ आहे. मात्र माझे वाडेट्टीवार‎ यांच्याशी फोनवर बोलणे झाले‎ असता मी मराठा समाज अथवा‎ आंदोलक जरांगे यांच्याविरोधात‎ कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा‎ खुलासा त्यांनी केला, असे डॉ. ‎कल्याण काळे यांनी सांगितले.‎

Jarange Patal’s warning, Vadettivars should not speak against society, otherwise they will demolish Congress seats!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात