वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट जपान आणि सिंगापूरचा आहे. पाकिस्तान आणि उत्तर कोरियाचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत आहेत.हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्व पासपोर्टला क्रमांक दिले आहेत. तसेच या देशांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.Japan, Singapore’s passport is the most powerful, India ranks 90th in the list; Pakistan, North Korea, however, is very weak
कोरोनाच्या उद्रेकानंतर, अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टमध्ये बदल केले. याचा परिणाम पासपोर्टवरही झाला आहे.जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची क्रमवारी जाहीर झाली आहे. यानुसार, जपान आणि सिंगापूरकडे सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत.
भारत, बुर्किना फासो, ताजिकिस्तानसह ९० व्या स्थानावर आहे. हेनले अँड पार्टनर्सने जगातील पॉवरफुल देशाच्या पासपोर्टचे रँकिंग जाहीर केले आहे. यानुसार, या देशांचे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय ५८ देशांमध्ये प्रवेश करू शकतात.
हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जपान आणि सिंगापूरचा स्कोअर १९२ आहे आणि सर्वात वर आहेत. याचा अर्थ असा की या देशांचे पासपोर्टधारक जगातील १९२ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. पाकिस्तान, इराक, येमेन, अफगाणिस्तान सारख्या देशांचे पासपोर्ट सर्वात कमी पॉवरफुल आहेत.
पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App