दोन दिवसात चार आमदारांचे राजीनामे, दोन माजी मंत्री
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी जननायक जनता पक्षाला ( Jannayak Janata Party ) मोठा धक्का बसला आहे. माजी पंचायत मंत्री टोहानाचे आमदार देवेंद्र बबली यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष अजय चौटाला यांना पत्र पाठवून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
त्याचवेळी जेजेपी पक्षाकडून 2019 मध्ये कैथलच्या गुहला राखीव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या ईश्वर सिंह यांनीही पक्षाचा निरोप घेतला आहे. विद्यमान आमदार ईश्वर सिंह यांनी आपला राजीनामा जेजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय चौटाला यांच्याकडे लेखी स्वरूपात दिला आहे.
त्याचवेळी शाहबादचे आमदार रामकरण यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत चार आमदारांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं ईश्वर सिंह आणि रामकरण यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App