विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेत देशातल्या सर्व नागरिकांचा समावेश व्हावा, त्यांची सहभागीता वाढावी, यात गरिबातल्या गरीबही औपचारिक अर्थव्यवस्थेतून सुटू नये, या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन अकाउंट्सला 10 वर्षे पूर्ण झाली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून देशवासीयांचे अभिनंदन करताना काही इंटरेस्टिंग माहिती दिली.
जनधन अकाउंट्सने देशातल्या नागरिकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत केवळ सामीलच करून घेतले असे नाही, तर गरिबातल्या गरीब नागरिकाला देशाची बँकिंग सिस्टीम समजावली. उपलब्ध उत्पन्नातून बचतीची सवय लावली. त्याला विशिष्ट आर्थिक सुरक्षितता उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेला एक शिस्त आणली, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.
Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!
देशाची अर्थव्यवस्था वेगाने जगातल्या तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करत असताना जनधन अकाउंट्समध्ये नेमकी संख्या किती आणि त्या अकाउंट्स मध्ये रक्कम किती??, याचीही माहिती पंतप्रधान मोदींनी दिली त्यानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये तब्बल 53 + कोटी भारत यांनी जनधन अकाउंट उघडली आणि त्यामध्ये तब्बल 23 अब्ज 12 कोटी 35 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठेवली गेली, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये आवर्जून नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App