जम्मू- कश्मीरच्या यूपीएससी टॉपरला अखेर झाली उपरती, मोदी-शहांची भाषणे शेअर करत पुन्हा सेवेत परतण्याचे दिले संकेत

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटविण्यास विरोध म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची नोकरी सोडणाऱ्या सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेले माजी आयएएस शाह फैसल यांनी सेवेत परतण्याचे संकेत दिले आहेत. आता ते सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या धोरणांचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भाषणे शेअर करतात.Jammu and Kashmir’s UPSC topper finally gets over, sharing Modi-Shah speeches, hints to return to service

जम्मू-काश्मीरचे पहिले यूपीएससी टॉपर असलेल्या शाह यांनी बुधवारी एकामागून एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या आदर्शवादा बद्दल मत व्यक्त केले. राजकारणात येण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही फैसलने विरोध केला होता. त्यासाठी त्याला अटकही झाली होती. मात्र, सुटकेनंतर फैजलने राजकारण सोडले.



शाह यांनी ट्विट केले की, ‘गेल्या आठ महिन्यांत (जानेवारी 2019-आॅगस्ट 2019) मी खचून गेलो आहे, मी बºयाच वर्षांच्या कठोर परिश्रमातून तयार केलेले जवळजवळ सर्व काही गमावले आहे. मग ती नोकरी असो, मित्र असो किंवा प्रतिष्ठा असो. माज्या आदर्शवादाने मला निराश केले आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझ्या स्वत:वर पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारु शकतो.

आयुष्य मला आणखी एक संधी नक्कीच देईल. मला मागील 8 महिने पूर्णपणे मिटवायचे आहेत. अपयश आपल्याला आणखी मजबूत बनवतात. मी आज 39 वर्षांचा झालो आहे आणि मी नवीन सुरुवात करण्यास उत्सुक आहे.विशेष म्हणजे फैसलने ‘आणखी एक संधी’ म्हणजे काय ते स्पष्ट केलेले नाही.

ते आयएएस अधिकारी किंवा जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार म्हणून सरकारी सेवेत परत येतील अशी अपेक्षा आहे. फैझलसोबत काम केलेल्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी सेवेत परतण्याच्या त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

शाह फैसलने 2009 मध्ये यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. मात्र देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर राज होऊन त्यांनी जानेवारी 2019 मध्ये सरकारी नोकरीचा त्याग केला. काश्मीरमध्ये होत हत्या सरकारने गांभीयार्ने न घेतल्याने ते सरकारवर नाराज होते. मात्र, त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला नाही. त्यानंतर मार्च 2019 मध्ये शाह यांनी ‘जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट’ हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. यासोबतच विधानसभा निवडणूक लढवण्याची योजनाही आखली होती.

Jammu and Kashmir’s UPSC topper finally gets over, sharing Modi-Shah speeches, hints to return to service

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात