जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढविणार नाही ; मेहबुबा मुफ्ती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरला जोपर्यंत विशेष दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत निवडणूक लढविणार नाही, असे पिडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. Jammu and Kashmir will not contest elections till it gets special status

केंद्र सरकारने जम्मू – काश्मीर आणि राज्यातील नागगरीका मधील ‘दिलं की दुरी’ कमी करण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, सरकारने राज्याचे विभाजन करून केंद्र शासित प्रदेश करण्याचा ५ ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय मागे घ्यावा.

केंद्र शासित प्रदेशात होणारी निवडणूक मी लढविणार नाही. तसेच या निर्णयामुळे राजकीय पोकळीचा लाभ अन्य कोणाला मिळू नये, याची काळजी घेतली जाईल. याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणूक जाहीर झाली तर पिडीपीचे सदस्य एकत्र बसून चर्चा करतील.

एखाद्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली तर गुन्हा दाखल होतो. मात्र ट्विटरवर भावना व्यक्त केल्यास त्या व्यक्त करणाऱ्याला अटक होते, याला लोकशाही म्हणायचे काय ?,असा प्रश्न त्यांनी विचारला. केंद्र शासित प्रदेश करून सरकारने नोकरशाही आणली असल्याचा आरोप त्यांनी केला.

Jammu and Kashmir will not contest elections till it gets special status

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात