एके 47, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेडसह मोठ्याप्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त
विशेष प्रतिनिधी
बालाकोट : काश्मीर खोऱ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोमवारी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक एके 47, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेड आणि पाक वंशाच्या औषधांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. Jammu and Kashmir Infiltration attempt on LOC failed in Balakot two terrorists killed
अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक गुप्तचर संस्था आणि पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून असे दिसून आले आहे की काही दहशतवादी नियंत्रण रेषेपलीकडे बालाकोट सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या इनपुट्सच्या आधारे, दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणांवर एक पाळत ठेवणारी ग्रीड हाय अलर्टवर ठेवण्यात आली होती.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामान, दाट धुके, दाट झाडी आणि खडबडीत भूभागाचा फायदा घेत सोमवारी सकाळी बालाकोट सेक्टरच्या हमीरपूर भागात दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. जवानांनी दोन दहशतवाद्यांना हे करताना पाहिले, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. ज्यात एक दहशतवादी गोळी लागताच तो जमिनीवर पडला. तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.
यानंतर या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला सोमवारी दुपारी हवामान आणि दृश्यमानता सुधारल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. झडतीदरम्यान एलओसीकडे जाणाऱ्या रक्ताच्या खुणाही आढळून आल्या. “गुप्तचर माहितीनुसार, घुसखोरीचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी त्यांच्याच सैन्याच्या गोळीबारात जखमी झाले. पण तरीही नियंत्रण रेषा ओलांडून परत येण्यात यशस्वी झाले, पण नंतर त्यांचा मृत्यू झाला. नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराचे जवान लक्ष ठेवून आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App