१२ वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir ) काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बनिहाल मतदारसंघाचे उमेदवार विकार रसूल वानी आणि अन्य पाच आरोपींना एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने पाचही जणांना पाच महिन्यांची शिक्षा आणि पाचही जणांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. 12 वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
2012 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गुलावठी येथील मिठेपूर गावात असलेल्या ज्युनिअर हायस्कूलमध्ये परवानगीशिवाय जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. विकार रसूल वाणी यांनी या जाहीर सभेचे आयोजन केले होते. विकार रसूल यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा आरोप होता. कोर्टाने आरोप खरे ठरवून विकारसह पाच जणांना शिक्षा सुनावली.
या प्रकरणी न्यायालयाने ज्यांना शिक्षा ठोठावली आहे त्यात विकार व्यतिरिक्त भारतभूषण शर्मा, सचिन, इक्रामुद्दीन आणि नाझीम यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना पाच महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या ९० जागांसाठी १८ आणि २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात बनिहालसह २४ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. २०१४ मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App