जल जीवन मिशन : एन्सेफलायटीस हॉट स्पॉटमधील १ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा, ५ राज्यांतील ६१ जिल्ह्यांत दिलासादायक चित्र

Jal Jeevan Mission 10 million homes in encephalitis hot spots get tap water access

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशन ही ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची देशातील प्रमुख योजना आहे. आता जपानी एन्सेफलायटीस-एक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोमसाठी हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 61 जिल्ह्यांमधील 1 कोटींहून अधिक घरांपर्यंत आता या योजनेचा विस्तार झाला आहे. लहान मुलांमध्ये मेंदूज्वराला कारणीभूत असणाऱ्या या आजारात आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुआयामी उपचारांची गरज असते. Jal Jeevan Mission 10 million homes in encephalitis hot spots get tap water access


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जल जीवन मिशन ही ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची देशातील प्रमुख योजना आहे. आता जपानी एन्सेफलायटीस-एक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोमसाठी हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 61 जिल्ह्यांमधील 1 कोटींहून अधिक घरांपर्यंत आता या योजनेचा विस्तार झाला आहे. लहान मुलांमध्ये मेंदूज्वराला कारणीभूत असणाऱ्या या आजारात आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुआयामी उपचारांची गरज असते.

पाच राज्यांमधील 61 जिल्हे विविध प्रकारच्या एन्सेफलायटीससाठी हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. वर्षानुवर्षे वारंवार होणाऱ्या संसर्गाच्या उद्रेकांनी मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम केला आहे, विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

या जिल्ह्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवलेल्या घरांची वाढलेली आकडेवारी हा मैलाचा दगड असल्याचे जलशक्ती मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. अधिकारी म्हणाले, “61 प्राधान्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये घरगुती नळ जोडणीत 32% वाढ झाली आहे, जी मागील 22 महिन्यांत देशात नळ जोडणी पुरवण्याच्या राष्ट्रीय सरासरी 23.43% च्या वाढीपेक्षा 12% जास्त आहे.”

जलजीवन अभियानाअंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पाण्याचे नळ उपलब्ध करून देण्याच्या एकूण उद्दिष्टामध्ये प्राधान्य विभाग कव्हर करण्याचा हा सर्वात मोठा वेग आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी चांगली स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी आवश्यक आहे.

एन्सेफलायटीस सिंड्रोम, ज्यात जपानी एन्सेफलायटीसचा (जेई) समावेश आहेत हा आजार विविध प्रकारच्या व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी, बुरशी आणि स्पिरोशेट्समुळे होतो. या आजाराला रोखण्याच सर्वात प्रभावी माध्यम हे लसीकरणही आहे, परंतु याचबरोबर आरोग्याच्या इतर बाबींवरही लक्ष देणे गरजेचे आहे.

“स्वच्छ पिण्याचे पाणी नसल्याने एन्सेफलायटीस सिंड्रोम बळावतो, कारण असुरक्षित पाणी बिघडलेल्या आरोग्याचे कारण आहे. अशा बालकांना बरे होण्यास दीर्घ काळ लागतो.

एन्सेफलायटीस सिंड्रोम ही भारतातील एक गंभीर सार्वजनिक-आरोग्य समस्या आहे. नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामनुसार, 2007 ते 2016 दरम्यान, स्थानिक जिल्ह्यांमधून 70,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या तीन दशकांत एन्सेफलायटीसमुळे 30,000 हून अधिक मुलांचा बळी गेला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. अधिकृत आकडेवारीनुसार, जेव्हा 2019 मध्ये जल जीवन मिशन सुरू झाले तेव्हा 61 जिल्ह्यांमधील जवळजवळ 800,000 किंवा 2.67% कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत होता. गेल्या महिन्याच्या अखेरीस, अतिरिक्त 97 लाख कुटुंबांना नळाच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे एकूण संख्या 1 कोटी किंवा एकूण घरांच्या 35% पर्यंत वाढली आहे.

Jal Jeevan Mission 10 million homes in encephalitis hot spots get tap water access

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात