कुर्बानीसाठी आणलेल्या २५० शेळ्यांना खरेदी करून जैन बांधवांनी दाखवली भूतदया!

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील घटना; सर्व बकऱ्या आता ‘शेळी निवारा’ ठिकाणी सुरक्षित

विशेष प्रतिनिधी

बागपत : देशभरात गुरुवारी ईद उल अजहा हा सण साजरा करण्यात आला. मुस्लिमांच्या या सणाला बकरी ईद असेही म्हणतात. बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा म्हणजे शेळ्यांचा बळी देण्यात येतो. देशभरात शेळ्यांच्या कुर्बानीबाबत अनेक बातम्या समोर आल्या परंतु दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या ठिकाणी जैन बांधवांनी २५० शेळ्यांचा जीव वाचवला आहे. Jain brothers showed mercy by buying 250 goats brought for sacrifice

उत्तर प्रदेशातील बागपत येथे जैन समुदायाच्या सदस्यांनी बकरी ईदपूर्वी २५० शेळ्या खरेदी केल्या आणि त्यांचा जीव जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना ‘शेळी निवारा’  ठिकाणी पाठवले.  दिनेश जैन म्हणाले, “आमच्या जैन संतांनी आम्हाला शेळी निवारा ठिकाण तयार करण्यासाठी प्रेरित केले. आमच्या भागात मुस्लीम खूप आहेत आणि यावर कोणीही आक्षेप घेतला नाही.”.

शेळ्यांचा बळी दिला  जाऊ नये म्हणून जैन समाजाने बाजारातून मोठ्या प्रमाणात शेळ्यांची खरेदी केली.  बागपत जिल्ह्यातील अमीनगर सराय शहरातील ही घटना आहे. जैन समाजातील लोकांनी बाजारात विक्रीसाठी आलेल्या २५० शेळ्या खरेदी करून ‘शेळी निवारा’मध्ये ठेवल्या आहेत. या मुक्या प्राण्यांना बळी जाण्यापासून वाचवता यावे यासाठी जैन समाजाने हे केले आहे.

Jain brothers showed mercy by buying 250 goats brought for sacrifice

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात