वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जहांगीरपुरी मध्ये हनुमान जयंतीला मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवणारा मुख्य आरोपी एस. के. फरीद याला दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगाल मधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील एका गावातून अटक केली आहे. जहांगीरपुरी मध्ये हिंसाचार घडवून फरीहा दुसऱ्याच दिवशी बंगाल मध्ये पळून गेला होता. दिल्ली पोलिसांनी काल सायंकाळी गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार आणि बंगाल पोलिसांच्या सहाय्याने फरीदला बेड्या ठोकल्या. Jahangirpuri Violence: The main accused S. K. Farid arrested from Bengal
जहांगिरपुरीत 16 एप्रिल ला हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक करून हिंसाचार घडविणार्या 30 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये फरीद मुख्य आरोपी आहे. त्याचे जोडीदार जफर आणि बाबुद्दीन यांना आधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी फरीद बंगालमध्ये पळून गेल्याचा माहिती दिली होती.
फरीदा मूळचा बंगालमधल्या नामख्याल क्या है मसीहाल गावाचा रहिवासी आहे. 34 वर्षापूर्वी बंगाल सोडून तो दिल्लीत स्थलांतरित झाला होता. जहांगीरपुरीत त्याने आपला अड्डा जमवला होता. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर त्याच्या गुंड टोळीने दगडफेक करून दंगल घडवली होती. आता हे सगळे पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App