वृत्तसंस्था
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मस्कतला जाण्यापासून मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. तब्बल २०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तिला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात देण्यात येऊन पुढील चौकशी आणि तपासासाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.Jacqueline Fernandez in the custody of ED from Mumbai Airport
Actor Jacqueline Fernandez was stopped at the Mumbai Airport by immigration officials due to a LOC (Look Out Circular) in connection with a Rs 200 crore extortion case involving conman Sukesh. She was supposed to fly to Muscat: Sources — ANI (@ANI) December 5, 2021
Actor Jacqueline Fernandez was stopped at the Mumbai Airport by immigration officials due to a LOC (Look Out Circular) in connection with a Rs 200 crore extortion case involving conman Sukesh. She was supposed to fly to Muscat: Sources
— ANI (@ANI) December 5, 2021
सुरेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसवर ईडीने लुकआऊट नोटीस जारी केली होती. एका शोसाठी ती मुंबईहून मस्कतला निघाली होती. टर्मिनल 3 जवळ गेटमधून बाहेर पडताच तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी लूक आऊट नोटिशीला अनुसरून तिला विमानात बसण्यापासून रोखले त्यानंतर कायदेशीर कारवाई करत तिच्या पुढच्या चौकशीसाठी तिला दिल्लीला नेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
घोटाळेबाज सुरेश चंद्रशेखर याने तिला 51 लाख रुपयांचा घोडा आणि नऊ लाख रुपयांची मांजर भेटवस्तू म्हणून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातल्या बातम्या देखील मीडियात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या आहेत. आज ती दुपारी मुंबईहून मस्कतला एका शोसाठी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी टर्मिनल 3 च्या गेटवरच रोखले. यापुढे ईडीचे अधिकारी तिची चौकशी करणार आहेत. या तपासातून आणखी काय खुलासे होतात, याची उत्सुकता लागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App