विशेष प्रतिनिधी
पाटणा : भाजपचे कार्यकर्ते सेवा ही संघटन है हे पक्षाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष जगत होते. दुसऱ्या लाटेत कोणतीही भीती न बाळगता ते गरजूंना मदत करीत होते. इतरांनी मात्र केवळ ट्विटरवरच सक्रियता ठेवली होती, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तेजस्वी यादव यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. J.P.Nadda lashes on oppostion
ते म्हणाले की, आणीबाणीच्या कालावधीत काँग्रेसने केलेल्या दडपशाहीची आजच्या पिढीला माहिती द्यावी लागेल. याशिवाय बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या काळात सुमारे १५ वर्षे राज्यात कायदाच अस्तित्वात नव्हता. आणीबाणीच्या वेळी आमचे नेते जयप्रकाश नारायण यांच्या घरी केले तरी अटक केली जायची. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राज्य होते तेव्हा लोक सूर्यास्तानंतर घराबाहेर पडायला घाबरायचे. डॉक्टर मंडळी, व्यावासयिक तज्ज्ञांना खंडणीखोरांकडून अपहरण होण्याच्या भीतीने बिहार सोडून इतर राज्यांत स्थलांतर करणे भाग पडले होते. तोच बिहार आता आमच्या राजवटीत पूर्ण सुरक्षित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App