काँग्रेस विभाजनाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी अमेरिकेत मुस्लीम लीगवर केलेल्या वक्तव्यानंतर देशात राजकीय खळबळ माजली आहे. राहुल यांनी मुस्लीम लीगला धर्मनिरपेक्ष म्हटल्याने आता भाजपाने टीका केली आहे. राहुल गांधींना काहीच माहीत नसते आणि ते विचार न करता विधाने करतात, असे भाजपाने म्हटले आहे. It would have been better if Rahul Gandhi had known history BJP counter attack on Muslim League being called secular
राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पलटवार करत, त्यांनी आधी इतिहास वाचावा आणि मगच बोलावे, असे म्हटले आहे. सुधांशू म्हणाले की, पूर्वी काँग्रेस मुस्लीम लीगला भाजपाशी जोडत असे आणि आता राहुल काही वेगळेच सूर गात आहेत.
याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल म्हणाले की, काँग्रेस मुस्लीम लीगला धर्मनिरपेक्ष मानते, पण भाजपाला फुटीर असल्याबद्दल लक्ष्य करते. काँग्रेस विभाजनाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करत आहे, हे देशाने समजून घेतले पाहिजे.
राहुल गांधी काय म्हणाले? –
राहुल गांधी वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले. येथे त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान राहुल यांना केरळमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबत काँग्रेसच्या युतीबाबत विचारले असता राहुल म्हणाले, मुस्लीम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात नॉन सेक्युलर असे काहीही नाही. वास्तविक, इंडियन युनियन मुस्लीम लीग केरळमधील काँग्रेस आघाडीचा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App