बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याचा निर्णय राजीव गांधींचा नव्हता; मणिशंकर अय्यरांचा दावा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. देशात आणि परदेशात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. पण INDI आघाडीत “राजकीय शोक” आहे. “शोकसंतप्त” काँग्रेस नेते वेगवेगळी वक्तव्य करून त्या उत्साहात बिबा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असेच एक वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी करून मंदिर लोकार्पण सोहळ्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे.It was not Rajiv Gandhi’s decision to open the Babri Masjid; Mani Shankar Iyer’s claim

बाबरी मशिदीचे कुलूप उघडण्याचा निर्णय हा तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा नव्हता, तर तो काँग्रेसच्या इतर नेत्यांचा होता, असा दावा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.1986 मध्ये बाबरी मशिदीचे उघडण्यात आले. त्यावेळी काँग्रेस पक्षात अरुण नेहरु हे शक्तिशाली नेता होते. त्यांनी राजीव गांधींना भारीस घातल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. भाजपनेच अरुण नेहरू यांना काँग्रेसमध्ये ‘प्लांट’ केले होते, असा आरोप देखील अय्यर यांनी केला. अरुण नेहरु हे या सगळ्यामागे आहेत हे जेव्हा राजीव गांधींना एक वर्षाने कळले, तेव्हा अरुण नेहरु थेट भाजपमध्ये सामील झाले होते, असा दावा देखील अय्यर यांनी केला.

1991 मध्ये राजीव गांधी यांचा मृत्यू झाला नसता, तर अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात त्यांनी समाधानकारक तोडगा काढला असता. त्यामुळे बाबरी मशिद पण कायम राहिली असती आणि राम मंदिर देखील बनले असते. राजीव गांधी यांच्याकडे 400 पेक्षा अधिक खासदार होत्या. हिंदू-मुस्लीम वाद घडवून आणण्याचे त्यांना कोणतेच कारण नव्हते, असे मणिशंकर अय्यर म्हणाले.

निमंत्रण न स्वीकारण्याचे स्वागत

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप राजकारण करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी या सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारून ते तुच्छ राजकारणाचा भाग नसल्याचे दाखवून दिले आहे. आपण काँग्रेसी असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.

It was not Rajiv Gandhi’s decision to open the Babri Masjid; Mani Shankar Iyer’s claim

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात