पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.It shows Mamata Banerjee’s Sanskaras, Smriti Irani’s attack
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.
इराणी म्हणाल्या, मला हे ऐकून धक्काच बसला की, महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शाह यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात.
जलपैगुडी येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, जेव्हा करोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा मोदी आणि शाह आले नाहीत. पण आता त्यांनी इथे बाहेरून लोकांना आणलंय व करोना वाढायला लागल्यावर पळून जात आहेत.
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने उपºयांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही करोना आणलात आणि पळून गेलात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App