जय श्रीराम, खेल होबेच्या घोषणांनी आसमंत दणाणला, ममतादिदींना प्रत्युत्तर देण्यासाठी स्मृती इराणी मैदानात

विशेष प्रतिनिधी

कोलकता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी मैदानात उतरल्या. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान इराणी यांनी स्कूटीवरुन सुमारे २५ किलोमीटरचे अंतर पार करीत बंगालवासियांचे मन जिंकले. Smriti Irani targets Mamatadidi

भाजपकडून राज्यात परिवर्तन यात्रा सुरु असून त्याचाच एक भाग म्हणजे भाजप खासदार रुपा गांगुली आणि अग्निमित्र पॉल यांनी गारियाजवळील गंजगाजोरा येथे रथयात्रेचे आयोजन केले होते. यात केंद्रीय मंत्री स्मृति इराणी सहभागी झाल्या होत्या. थोडावेळ्यानंतर इराणी रथावरुन उतरल्या आणि स्कूटर हातात घेली. यावेळी त्यांनी हेल्मेटही घातले.इराणी यांनी स्कूटी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. यावेळी जय श्रीराम, खेल होबे (सामना होणारच) अशा घोषणा देण्यात आल्या. खेल होबे हे घोषवाक्य अगोदर तृणमूल कॉंग्रेसने उच्चारले होते. परंतु आता पश्चिहम बंगाल निवडणुकीची टॅगलाइन झाली आहे. गाडीवरुन जाताना इराणी यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी बंगाली भाषेतूच संवाद साधला. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी जमत होती.

परिवर्तन यात्रेदरम्यान स्मृति इराणी यांनी ममता बॅनर्जींवर टीका करत, तुमचा काळ आता संपला आहे. तुमच्या काळात बंगालमध्ये केवळ हिंसाचार झाला. या ठिकाणी लोकशाही संपली, लोकांचा आवाज दाबला. आता तीच जनता तुम्हाला हरवण्याचे काम करेल आणि कमळ बहरेल.

Smriti Irani targets Mamatadidi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*