विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ईशान्य भारत आणि पश्चिेम बंगालमध्ये सिमेंट उत्पादन आणि रेल्वे कंत्राट घेणाऱ्या समूहांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापे घातले. या कारवाईत सुमारे अडीचशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता आणि रोकड जप्त केल्याचा दावा प्राप्तीकर खात्याने केला आहे.IT raids seized 250 cr in Northen India
सीबीडीटीने निवेदनात म्हटले की, बंगाल, आसाममधील छापेमारीत अडीचशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्नाचा शोध लागला आणि त्यात ५१ लाखांपेक्षा अधिक रोकड आढळून आली आहे. या संबंधी बँकेतील नऊ लॉकर सील केले असून त्याची तपासणी करणे अद्याप बाकी आहे
सिमेंट उद्योग समूहावरील कारवाईसंदर्भात माहिती देताना म्हटले की, नोंद न ठेवता उत्पन्न मिळवण्यात आले आणि बोगस खर्च दाखवून उत्पन्न मिळवले. हे बेहिशेबी उत्पन्न कागदोपत्री असलेल्या कंपन्यांच्या मार्फत बाजारात आणले गेले. कागदोपत्री कंपन्यांचे बोगस व्यवहार केले जात होते.
कागदपत्रावर असलेल्या कंपन्यांचे प्रत्यक्षात अस्तित्वच नव्हते. तपासादरम्यान या कंपन्यांच्या नावाने बोगस व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. बनावट शेअर, बोगस वैयक्तिक कर्ज आदी गैरप्रकार केले गेले. एवढेच नाही तर या समुहाने आदिवासी लोकांना चुकीच्या मार्गाने कर्जदार म्हणून दाखवले असून त्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम ही सुमारे ३८ कोटी रुपये एवढी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App