विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद आहे. तुमच्या मुलांना अगोदर सीमेवर पाठवा, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी पंजाब कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना सुनावले आहे.It is a shame to call Imran Khan big brother, send your children to the border, Gautam Gambhir told Navjyot Singh Sidhu
भाजपा खासदार गौतम गंभीर म्हणाले की, भारत ७० वर्षांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाशी लढत आहे आणि सिद्धू दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ म्हणत आहेत हे लज्जास्पद आहे.आधी तुमच्या मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा आणि नंतर दहशतवादी देशाच्या प्रमुखाला तुमचा मोठा भाऊ म्हणा.
शनिवारी पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोठे भाऊ असे वर्णन केले होते. पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर करतारपूर कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटचे सीईओ मोहम्मद लतीफ यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांचे स्वागत केले.
त्याचवेळी, त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्यावतीने नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे अभिनंदन केले, ज्यावर सिद्धू यांनी इमरान खानचे कौतुक केले आणि त्यांना आपला मोठा भाऊ म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App