इम्रान खान यांच्यासमोर देश चालवण्याचे संकट, TLPच्या हिंसक आंदोलनांमुळे अर्थव्यवस्थेचे तब्बल 35 अब्ज रुपयांचे नुकसान


पाकिस्तानातील कट्टरपंथी इस्लामिक संघटना तहरीक-ए-लब्बेक (टीएलपी) ने इम्रान सरकारची झोप उडवली आहे. अशा मागण्या या संघटनेने सरकारसमोर ठेवल्या आहेत, ज्या कुणालाही धक्का देतील. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी टीएलपीने देशभरात हिंसक आंदोलने केली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 35 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.Pakistan suffers 35 billion rupees economy loss due to tehreek e labbaik tlp protest


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानातील कट्टरपंथी इस्लामिक संघटना तहरीक-ए-लब्बेक (टीएलपी) ने इम्रान सरकारची झोप उडवली आहे. अशा मागण्या या संघटनेने सरकारसमोर ठेवल्या आहेत, ज्या कुणालाही धक्का देतील. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी टीएलपीने देशभरात हिंसक आंदोलने केली.

त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 35 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. लाहोरमध्ये मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक हसन खवर यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. FATFच्या ग्रे लिस्टमध्ये असल्यामुळे देशाला कर्ज घेण्यातही अडचणी येत आहेत.हसन खवर पुढे म्हणाले की, टीएलपी निदर्शने आणि रस्ते अडवल्यामुळे आधीच 4 अब्ज रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले आहे. रस्ते बंद झाल्यामुळे फळे आणि भाज्यांचा पुरवठा बाजारपेठेत पोहोचू शकला नाही, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. ट्रकमध्ये पडलेले खाद्यपदार्थ कुजले.

TLP आंदोलकांनी केलेल्या गोळीबारात चार पोलिसांचाही मृत्यू झाला असून सुमारे 250 लोक जखमी झाले आहेत. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, वाढत्या विरोधादरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ म्हणाले होते की, प्रतिबंधित टीएलपीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

2017 पासून आंदोलन

टीएलपी ही कट्टरतावादी संघटना सन 2017 पासून देशात निदर्शने करत आहे. यादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे 35 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले की TLP ने देशाचा संयम संपवला आहे,

पोलिसांची हत्या केली आहे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे आणि अजूनही सतत नुकसान होत आहे. लाहोरमध्ये शनिवारी या बंदी घातलेल्या संघटनेच्या सदस्यांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यात अनेक लोक जखमी झाले.

Pakistan suffers 35 billion rupees economy loss due to tehreek e labbaik tlp protest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!