इस्रोचे वैज्ञानिक चांद्रयान 3 मोहिमेचे संचालक वीरमुथुवेल यांनी ₹ 25 लाखांचे केले दान!!

विशेष प्रतिनिधी

बेंगलुरू : चांद्रयान 3 मोहिमेचे यश कुणा एकट्या वैज्ञानिकाचे नसून ते टीम वर्कचे यश आहे, अशा भावनेतून भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO चे शास्त्रज्ञ आणि चांद्रयान 3 चांद्र मोहिमेचे प्रकल्प संचालक डॉ. पी. वीरामुथुवेल यांनी ₹ 25 लाख – त्यांच्या दोन वर्षांच्या पगाराच्या बरोबरीची बक्षीस रक्कम दान केली आहे.ISRO Scientist Chandrayaan 3 Mission Director Veermuthuvel donates ₹ 25 Lakh!!

एकट्यानेच एवढी मोठी पुरस्काराची रक्कम घेणे माझ्या विवेकबुद्धीला पटत ​​नव्हते म्हणून ही रक्कम मी दान केली, असे वीरमुथुवेल यांनी प्रांजळपणे सांगितले.



चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या यशस्वी लँडिंगमध्ये केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक म्हणून तामिळनाडू सरकारने त्यांना 25 लाख ₹ बक्षीस दिले होते. त्यांच्या कोअर टीममधील आठ सदस्यांनाही हेच बक्षीस देण्यात आले. पण स्वतःवर ₹ 72 लाखांच्या गृहकर्जाचा बोजा असतानाही, वीरमुथुवेल यांनी एवढी मोठी रक्कम त्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला, ज्यांनी त्यांना शास्त्रज्ञ म्हणून घडविले. त्यांनी ही रक्कम एलुमलाई पॉलिटेक्निक कॉलेज, वेस्ट तांबरम, चेन्नईच्या माजी विद्यार्थी संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), तिरुचिरापल्ली; श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास, चेन्नई या संस्थांमध्ये वाटून दान केली.

वीरमुथुवेल यांचे वडील रेल्वेत तंत्रज्ञ म्हणून नोकरी करायचे. चांद्रयान 3 चे यश हे माझ्या एकट्याचे यश नाही, तर आमच्या टीम वर्कचे यश आहे अशा भावना वीरमुथुवेल यांनी बोलून दाखविल्या. मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे, विल्लुपुरममधील सरकारी रेल्वे शाळेत शिकलो आहे आणि तरीही माझ्यासाठी पैशाचा फारसा अर्थ नाही. इस्रो आम्हाला राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी एक समृद्ध वातावरण देते आणि ते सर्वात समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

चांद्रयान -3 मोहिमेसाठी ते गेल्या चार वर्षांपासून सतत काम करत होते आणि या कालावधीत त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. चंद्र मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा अमेरिका, पूर्वीचे सोव्हिएत युनियन आणि चीन नंतर चौथा देश बनला. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंगची नोंद 23 ऑगस्ट रोजी झाली.

ISRO Scientist Chandrayaan 3 Mission Director Veermuthuvel donates ₹ 25 Lakh!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात