Israel Palestine War : एअर इंडियाने इस्रायलला जाणारी उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत केली स्थगित

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्यानंतर  युद्धाची घोषणा केली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट डागले असून त्यात 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या या हल्ल्यानंतर  युद्धाची घोषणा केली आहे. Israel Palestine War Air India suspends flights to Israel till October 14

इस्त्रायल कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तोंड देण्यासाठी तयार असून आता हमासला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल 400 हून अधिक पॅलेस्टिनी अतिरेकी मारले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये 400 हून अधिक पॅलेस्टिनी अतिरेकी मारले गेले आहेत.

गाझामध्ये इस्रायलचे बॉम्ब हल्ले, 198 ठार; हमासने 5 हजार रॉकेट डागले, आतापर्यंत 70 इस्रायली मरण पावले

दरम्यान, भारतीय विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने इस्रायलला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत. या निर्णयाची  माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. प्रवक्त्याने सांगितले की या कालावधीत केलेल्या सर्व  बुकिंग संदर्भात सर्वोतोपरी मदत दिली जाईल.

Israel Palestine War Air India suspends flights to Israel till October 14

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात