अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाहीत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Israel-Hamas War गेल्या एक वर्षापासून मध्यपूर्वेत तणाव कायम आहे. इस्त्रायल गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. इस्त्रायली सैन्याने रविवारी गाझा पट्टीमध्ये जमिनीवर आणि हवाई हल्ले केल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 87 जणांचा मृत्यू झाला आहे.Israel-Hamas War
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने हा दावा केला आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, त्यांनी गाझाच्या उत्तर, मध्य आणि दक्षिणेकडील अनेक भागात हल्ले केले आहेत. आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, “जमीन आणि हवाई हल्ल्यादरम्यान सैन्याने डझनभर दहशतवाद्यांना ठार केले.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या हल्ल्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाहीत. इस्त्रायली लष्कराने गाझा आणि लेबनॉन या दोन्ही ठिकाणी कारवाया वाढवल्याचं सांगण्यात येत आहे.
या काळात लेबनॉनमध्ये जवळपास 175 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी उत्तर गाझामधील बीत लाहिया शहरात हवाई हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये डझनभर पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. इस्त्रायली सैन्याने गाझाच्या उत्तरेकडील भागाला गेल्या 16 दिवसांपासून वेढा घातला आहे. दरम्यान, 400,000 हून अधिक पॅलेस्टिनी अन्न आणि औषधांशिवाय अडकले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App