‘IRCTC’ सर्व्हर पाच तास ठप्प, भारतीय रेल्वेचे प्रचंड नुकसानं; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?


IRCTC ने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे अॅप आणि वेबसाइट आज (मंगळवार) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे पाच तास बंद राहिल्याने आयआरसीटीसीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. IRCTC ने ट्विट करून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून लोकांना तिकीट काढण्यात अडचणी येत होत्या. IRCTC server down for five hours heavy loss to Indian Railways

प्राप्त माहितीनुसार, आयआरसीटीसीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे आणि यासंदर्भात काही नंबरही आपल्या वेबसाइटवर टाकले आहेत. जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास त्या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करून माहिती मिळवता येईल.  वेबसाईट ओपन केल्यावर डाउनटाइमचा मेसेज दिसत होता. अॅपच्या मेंटेनन्समध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अॅपचा सिग्नल गेला आणि त्याचा सर्व्हर डाउन झाला.

तत्काळ बुकिंगमध्ये अडचणी आल्या

जेव्हा वेबसाइट डाउन होती, तेव्हा तत्काळ बुकिंगची वेळ आली होती, ज्यामुळे तत्काळ बुकिंग करणार्‍या अनेक वापरकर्त्यांना खूप मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर IRCTCकडे मदत मागितली, तर अनेक वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करून रेल्वेकडून उत्तरे मागितली. याशिवाय असेकाही प्रवासी पुढे आले, ज्यांच्या खात्यातून सुमारे 5-5 वेळा पैसे कापले गेले. यावर IRCTC ने 100 टक्के परतावा देण्याची घोषणा केली आहे.

IRCTC server down for five hours heavy loss to Indian Railways

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात