…अन् तलाठ्याने लाच म्हणून घेतलेले पाच हजार रुपये पोलिसांसमोरच अक्षरशा खाल्ले!


या अजब घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विशेष प्रतिनिधी

कटनी : मध्य प्रदेशातील कटनी येथील महसूल विभागाच्या तलाठ्याने सोमवारी लोकायुक्तांच्या विशेष पोलीस आस्थापना (एसपीई)च्या पथकाला पाहून लाच म्हणून घेतलेले पैसे गिळंकृत केले. या अजब घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षक संजय साहू यांनी सांगितले की, तलाठी गजेंद्र सिंग यांनी त्यांच्या खासगी कार्यालयात ५ हजार रुपये लाच घेतल्याचे उघड झाले आहे. Talathi literally ate the five thousand rupees taken as a bribe in front of the police

अधिकाऱ्याने सांगितले की, “बरखेडा गावातील एका व्यक्तीने आमच्याकडे तक्रार केली होती की गजेंद्र सिंग लाच मागत आहेत. यानंतर पैसे मिळाल्यानंतर तलाठ्याने एसपीई टीमला पाहून पैसे अक्षरशा गिळले. यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी तो ठीक असल्याचे सांगितले.” आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Talathi literally ate the five thousand rupees taken as a bribe in front of the police

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात