वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात दंगल प्रकरणात खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी अटक सतत सुरू केले असून वकील तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेनंतर आता गुजरातचे बडतर्फ माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना पोलिसांनी अटक केली आहे. IPS officer Sanjeev Bhatt arrested
अहमदाबाद पोलिसांनी काल मंगळवार 12 रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करत तिघांना अटक केली आहे. यामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे. हेच ते अरबी श्री कुमार आहेत ज्यांनी पक्षात शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्याविरुद्ध देखील खोटी केस दाखल केली होती.
मागच्या ब-याच काळापासून संजीव भट्ट हे पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत होते. पालनपूर तुरुंगामध्ये संजीव भट्ट यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेची तुकडी त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेली. आता गुजरात प्रकरणात संजीव भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणामध्ये निर्दोष लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App