प्रकृती पाहता न येण्याचेही करण्यात आले होते आवाहन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.Invitation to Murali Manohar Joshi LK Advani for the inauguration ceremony of Ram Mandir
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, राम मंदिर चळवळीचे प्रणेते आदरणीय लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले.
यावेळी राम मंदिर आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा दिला गेला. येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तत्पूर्वी, ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष चंपत राय म्हणाले होते की अडवाणीजींची उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु त्यांची प्रकृती पाहता त्यांनी येऊ नये असेही वाटते. लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे झाले आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी रथयात्रा काढून रामजन्मभूमी आंदोलनाला नवी दिशा दिली आणि बिहारमध्ये लालू यादव सरकारने त्यांना केलेली अटक होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App