INS Sumitra : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या तावडीतून १९ पाकिस्तानींची केली सुटका

नौदलाचे २४ तासांत आणखी एक यशस्वी ऑपरेशन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सोमाली चाच्यांविरुद्ध भारतीय नौदलाची कारवाई सुरूच आहे. भारतीय नौदलाने २४ तासांत दुसऱ्यांदा अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे.INS Sumitra Indian Navy rescued 19 Pakistanis from pirates

माहिती देताना, एका भारतीय संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, नौदल युद्धनौका INS सुमित्राने कोचीच्या किनारपट्टीपासून सुमारे 800 मैल दूर समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे.



भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की नौदल जहाज सुमित्राने सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आणखी एक चाचेगिरीविरोधी यशस्वी ऑपरेशन केले आहे. भारतीय नौदलाने 11 सोमाली चाच्यांपासून मासेमारी जहाज अल नामी आणि त्याच्या क्रूची सुटका केली आहे. या जहाजावर 19 पाकिस्तानी नागरिकही होते.

एक दिवस आधीही भारतीय नौदलाने यशस्वी ऑपरेशन केले होते. भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा हिने सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या मच्छिमारांची सुटका केली होती. चाच्यांनी इराणी जहाजाचे अपहरण केले होते, ज्यामध्ये सुमारे 17 क्रू मेंबर होते.

INS Sumitra Indian Navy rescued 19 Pakistanis from pirates

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात