प्रतिनिधी
मुंबई : जागतिक श्रीमंतीच्या क्रमवारीत पहिल्या पाचातले असलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागे नेमके काय कारण आहे?, यावर आता तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. Industrialist Gautam Adani meets Raj Thackeray on Shivtirtha; Invoking different arguments
आधी उद्धव ठाकरेंची भेट
सध्या उद्योगपती गौतम अदानी हे नेहमी मोठ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात. त्यांचे विविध राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. नुकतीच अदानी यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता गौतम अदानी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहेत.
धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास
राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा विषय काढला आहे. उद्योगांमध्ये मराठी तरुणांना संधी देण्याचा मुद्दा राज ठाकरे कायम मांडत असतात. तसेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर सध्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रकल्प अदानी यांच्याकडे आला आहे. अशा सर्व विषयांपैकी कोणत्या विषयावर अदानी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविणे सुरू झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App