इंदिरा गांधी, नरसिंह रावांच्या काळातले केंद्रीय मंत्री अरविंद नेतामांनी काँग्रेस सोडली; छत्तीसगडमध्ये मोठा धक्का!!

विशेष प्रतिनिधी

रायपूर : 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणाऱ्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले वरिष्ठ काँग्रेस नेते अरविंद नेताम यांनी काँग्रेस सोडली आहे. भाजपच्या हातातले खेळणे बनवून काँग्रेस पक्ष आपली धोरणे ठरवत आहे आणि त्यामुळे तो सातत्याने अपयशी ठरत आहे, असे शरसंधान अरविंद नेताम यांनी काँग्रेस हायकमांडसकट छत्तीसगड मधल्या नेतृत्वावर साधले आहे.Indira Gandhi, Narasimha Rao era Union Minister Arvind Netam quit Congress; Big shock in Chhattisgarh!!



1973 पासूनचे मंत्री

अरविंद नेताम हे छत्तीसगड मधले जुने जाणते आदिवासी नेते आहेत. 1973 ते 78 या कालावधीत ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर 1991 ते 1996 या काळात त्यांनी नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम केले. या कालावधीत अरविंद नेताम हे देशभर बडे आदिवासी नेता म्हणून ओळखले जायचे. पण काळ बदलला. छत्तीसगडच्या राजकारणात पुढची पिढी समोर आली आणि अरविंद नेताम हे अनेक वर्षे राजकीय दृष्ट्या विस्मरणात गेले. अरविंद नेताम केंद्रीय मंत्री असताना छत्तीसगड हे राज्य अस्तित्वात नव्हते. अखंड मध्य प्रदेश मध्ये छत्तीसगड हा एक भाग होता. त्या छत्तीसगडमध्ये आदिवासी नेता म्हणून अरविंद नेताम यांचे नाव फार मोठे आहे.

 भाजपशी संधान की आणखी काही??

वयाच्या 81 व्या वर्षी अरविंद नेताम यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय घेताना भाजप सह काँग्रेस नेत्यांवर शरसंधान साधले असले तरी छत्तीसगडच्या नेत्यांना मात्र त्यांचे आतून भाजपशी संधान जुळल्याचा संशय आहे. अरविंद नेताम यांनी सर्व आदिवासी समाज असे संघटना उभी केली असून त्या संघटनेत मार्फत छत्तीसगड विधानसभेच्या 50 ते 55 जागा लढविण्याचा त्यांचा इरादा आहे. यात आदिवासी राखीव जागांबरोबरच सर्वसाधारण गटातल्या विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यामुळे अरविंद नेताम हे छत्तीसगडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होऊ न देता आपला तिसरा पक्ष या लढतीत उतरवून भाजपला साथ देत असल्याचा काँग्रेसने त्यांना संशय आहे. पण तरी देखील अरविंद नेताम यांना तसे करण्यापासून रोखण्याची काँग्रेसने अद्याप तरी तयारी आणि क्षमता दाखवलेली नाही.

छत्तीसगड मधले दुसरे काँग्रेस नेते टी. एस. सिंगदेव यांना उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांचे बंड तात्पुरते शमविण्यात काँग्रेस हायकमांडला तात्पुरते यश आले आहे, पण अरविंद नेताम यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अद्याप तरी “पटविण्यात” काँग्रेस नेत्यांना यश आलेले दिसत नाही. उलट स्थानिक नेते अरविंद नेता यांच्यापासून विशिष्ट अंतर राखूनच आजही वावरताना दिसतात. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अरविंद नेताम नेमके कोणते राजकीय डावपेच खेळतील आणि त्याचा लाभ कोणाला होईल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Indira Gandhi, Narasimha Rao era Union Minister Arvind Netam quit Congress; Big shock in Chhattisgarh!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात