वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सन 1971 हे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातले सर्वाधिक चमकदार वर्ष होते. त्यावर्षी त्यांचे सर्वांगीण कर्तृत्व उजळून निघाले होते. स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करून त्यांनी सगळ्या जगाला चकित केले, असे गौरवोद्गार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज काढले आहेत. Indira Gandhi created independent Bangladesh, says Sonia Gandhi
बांगलादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका समारंभात त्या बोलत होत्या. इंदिराजींचे नेतृत्व कणखर होते. त्यांनी देशाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले आहे. पाकिस्तानशी युद्ध करताना त्यांचे धाडसी निर्णय संपूर्ण जगाला चकित करून गेले, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, की इंदिराजींनी आघाडीवर राहून देशाचे नेतृत्व केले होते.
सोनिया गांधींनी मला राजीनामा देण्यास सांगितले, पण पंजाबसाठी माझा लढा सुरूच राहील- कॅ. अमरिंदर सिंग
भारताला जग दुबळे समजत असताना इंदिराजींनी धाडसी पावले उचलून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यसैनिकांमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे सगळे जग चकित झाले. इंदिराजींचे नेतृत्व जागतिक पातळीवर झळाळून निघाले.
त्यावेळी बांगलादेशाच्या एक कोटी नागरिकांना भारताने आपल्या भूमीवर आश्रय दिल्याचे कधीही विसरता कामा नये. आपल्या जवानांनी शौर्याने आणि धैर्याने युद्धभूमीवर पराक्रम गाजवला. इंदिराजींच्या कणखर नेतृत्वाला आपल्या जवानांनी साथ दिली. त्यामुळे एक स्वतंत्र देश निर्माण होऊ शकला. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धयांनी अथक प्रयत्न करून आपले स्वतःचे भविष्य देखील निर्माण केले, असे उद्गारही सोनिया गांधी यांनी काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App