विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा आवाज आणि भूमिका खूप महत्त्वाचा आहे. यासाठी युनोच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरूपी स्थान मिळावे, यासाठी फ्रान्स भारताचा खंबीर समर्थक असल्याचा विश्वास फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनन दिला आहे.India’s role in international arena is important, France will support India to get permanent membership in UN Security Council
भारत हा एक आवाज आहे ज्याची दखल संपूर्ण जग घेत असल्याचेही इमॅन्युएल लेनन म्हणाले. भारताने प्रादेशिक अखंडतेच्या आदराबाबत विधाने केली आहेत जी अतिशय स्वागतार्ह आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.रशियाने युक्रेनमधून आपलं सैन्य माघार घ्यावं अशा आशयाचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पारित करण्यात आला.
यावेळी 141 देशांनी रशियाच्या विरोधात भूमिका घेत मतदान केलं तर 5 देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केलं. विशेष म्हणजे नेपाळने रशियाच्या विरोधात भूमिका घेतली तर भारताने सलग तिसऱ्यांदा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
एकूण 35 देशांनी या ठरावावर तटस्थ भूमिका घेतली. यामध्ये भारताचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धावर भारताने सलग तिस?्या ठरावावर तटस्थपणाची भूमिका घेतली आहे. भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या देशांनीही तटस्थता दाखवली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एखादा ठराव पारित होण्याकरता दोन तृतियांश मतदानाची गरज असते.संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आजच्या बैठकीत रशियाच्या आक्रमणाचा निषेध करण्यात आला आहे. रशियाने तातडीने सैन्य माघार घ्यावी आणि शांतता प्रस्थापित करावी असा ठराव मांडण्यात आला.
युरोपियन युनियनच्या सर्व देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं आहे.गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या आमसभेच्या 15 देशांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीतही भारताने रशियाविरोधातल्या ठरावावर तटस्थपणा दाखवला होता. त्यावेळी 11 देशांनी रशियाविरोधात मतदान केलं होतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App