वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने वैद्यकीय मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपकरणांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करून आणि त्यातील मोठा हिस्सा जपानमधून आयात केल्याने चिनी कंपन्यांचे लाखो डॉलर्सचे नुकसान होईल.India’s business strike on China Now medical MRI, ultrasonic equipment will be imported from Japan
दुसरीकडे, भारताचा विश्वासू भागीदार असलेल्या जपानच्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत मोठा प्रवेश करण्याची संधी मिळेल. केंद्र सरकारचा विश्वास आहे की, या निर्णयामुळे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत सामान्य रुग्णांना फायदा होईल, कारण चिनी उपकरणे परवडणारी आहेत, परंतु जपानी उपकरणांच्या उच्च दर्जाच्या जवळपासही नाहीत.
कोरोनानंतर भारतात चिनी वैद्यकीय उपकरणांची आयात 57 टक्क्यांनी वाढली आहे. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, 2020-21 मध्ये वैद्यकीय उपकरणांच्या प्रमुख श्रेणीतील चीनमधून आयात 327 मिलियन डॉलर (रु. 2,681 कोटी) वरून 515 मिलियन डॉलर (रु. 4,223 कोटी) झाली आहे. जपानने भारताच्या गरजा पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. G-20च्या दरम्यान क्वाड देशांच्या स्वतंत्र बैठकीत या विषयावरील चर्चेची निर्णायक फेरी झाली.
चीनमधून दरवर्षी 7,380 कोटी रुपयांची उपकरणे येतात
वैद्यकीय तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते भारत, अमेरिका, ब्रिटन यासारखे सर्व प्रमुख देश प्रगत उपकरणांसाठी चीन, जपान आणि सिंगापूरवर अवलंबून आहेत. चीन जगात सर्वाधिक उपकरणे पाठवतो आणि जपान सर्वात आधुनिक उपकरणे पाठवतो. भारत सध्या जपानकडून 131 मिलियन डॉलर (रु. 1,066 कोटी) किमतीची उपकरणे दरवर्षी आयात करत आहे. तर 900 मिलियन डॉलर (7,380 कोटी रुपये) किमतीची हीच उपकरणे चीनमधून येत आहेत. म्हणजे 7 पट जास्त.
पुढील पाच वर्षांत चीनकडून 130 मिलियन डॉलर्स (रु. 1,066 कोटी) आणि जपानमधून 900 मिलियन डॉलर्स (रु. 7,380 कोटी) किमतीची वैद्यकीय उपकरणे आयात करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे जपानसोबतच्या द्विपक्षीय व्यापारासाठी चीनच्या तुलनेत सीमाशुल्क कमी आहे.
चीन व्यापाराला बनवतो शस्त्र, आर्थिक झळ बसणे गरजेचे
रायसीना संवादादरम्यान चीनविरोधात आवाज उठवला गेला. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट म्हणाले की, चीन शस्त्रास्त्रांचा व्यापार करत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आर्थिक झळ पोहोचवणे आवश्यक आहे. या बैठकीनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी जपानमधील महत्त्वाच्या पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या मुद्द्यावर जपानी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App