वृत्तसंस्था
ढाका : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने हॉकीत पाकिस्तानविरोधात मोठा विजय मिळविला आहे. ३-१ अशा गोलफरकाने पराभव करून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. बांगला देशाची राजधानी ढाका येथील मौलाना भसानी हॉकी स्टेडियम येथे हा सामना शुक्रवारी खेळविला गेला. India’s big win over Pakistan in hockey; Defeated 3-1, entered the semifinals
हरमनप्रीतने दोन आणि आकाशदीपच्या एका गोल करून हा विजय भारताने सामना जिंकला आहे.पाकिस्तानला केवळ एकच गोल करता आला. हा गोल जुनैदने केला. हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. सामन्यात भारताने पहिल्यापासून आघाडी घेतली. ती पाकिस्तानी खेळाडूंना तोडता आली नाही.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करून प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करून २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला ३- १ अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली. भारताने सुरुवातीपासून आक्रमक आणि तडाखेबाज खेळ केला. त्यासमोर पाकिस्तानी खेळाडू तग धरू शकले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App