विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रजासत्ताक दिनी भारताच्या हवाई सामर्थ्याचे दर्शन घडणार आहे. लष्कराच्या तीनही सेवांतील ७५ विमाने या परेडमध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर बांग्ला देशातील लढ्याचे स्मरणही यावेळी केले जाणार आहे.India’s Air Force to be displayed in Republic Day parade, 75 aircraft to participate, Bangladesh’s independence
यंदाच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा फ्लायपास्ट हा आजपर्यंतचा सर्वात मोठा असेल. यामध्ये तीनही सेवांतील ७५ विमाने सहभागी होणार आहेत. १९७१ च्या युध्दात शहीद झालेल्या आपल्या जवानांना हवाई दलआदरांजली वाहणार आहे. भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाला यंदाच्या वर्षीच ५० वर्षे पूर्ण होणा आहेत.
हवाई दलाची विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्यासह नौदल आणि लष्कराच्या विमान वाहतूक शाखेची विमानेही हवाई प्रदर्शन सहभागी होणार आहेत. यामध्ये हवाई दलात नुकतीच दाखल झालेली राफेल, सू-३० एमकेआय, तेजस, जग्वार आणि मिग 29 यासह सर्व लढाऊ विमाने आणेल.
त्यांच्याकडे अपाचे, चिनूक, एमआय-१७ व्ही ५ ही हेलिकॉप्टर देखील असतील. हवाई दलाची डकोटा, डॉर्नियर आणि ग्नॅट सारखी विंटेज विमाने यामध्ये सहभागी होतील. पाकिस्तानच्या सेबर लढाऊ विमानांना पाडण्याची कामगिरी करणाऱ्या या विमानांना सेबर स्लेअर देखील म्हटले जाते.
नौदलाकडून मिग -२९ आणि आणि पी-८१ ही पाळत ठेवणारी विमाने सहभागी होतील. लष्कराकडून, शस्त्रास्त्रयुक्त प्रगत हलके हेलिकॉप्टर रुद्र फ्लायपास्ट फॉर्मेशनचा भाग असतील.बांग्ला देश युध्दात टांगैल नावाच्या ठिकाणी सैनिकांना शत्रूच्या भागात सोडण्यासाठी वापरलेले डकोटा विमान फ्लायपास्टचा भाग असेल.
ढाकाजवळील नदीच्या पलीकडे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून हजारो भारतीय लष्करी जवानांना नदीच्या पलीकडे नेण्यात आले,ही कामगिरी बजावणारे चिनूक विमानही यामध्ये सहभागी होणार आहे.
हवाई दलाच्या इतर यंत्रणांसह १९७१ च्या युद्धात ढाका येथील गव्हर्नर हाऊसवर हल्ला करणाऱ्या मिग-21 विमानाची कामगिरी दाखवली जाणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात राफेलवरील स्कॅल्प, मेटियर आणि मीका यांचा समावेश असेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App