विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटीतील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. इंग्लंडपाठोपाठ आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही विजय मिळवला आहे. टीम इंडियाने एकमेव कसोटी सामन्यात कांगारू संघाचा आठ गडी राखून पराभव केला.Indian womens team made history Defeated Australia for the first time in a Test
भारताने 406 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य दोन गडी गमावून भारताने पूर्ण केले.
स्मृती मंधानाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. शेफाली वर्माला केवळ चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि ऍशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये 1977 पासून आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App