कोरोना संसर्गस्थितीचा असाही फटका, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी अमेरिकेलाच सर्वाधिक पसंती आहे. Indian Student numbers in USA declined due to corona

या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यांत ६२ हजार विद्यार्थी व्हिसा दिल्याचे आणि ही संख्या इतर कोणत्याही वर्षापेक्षा अधिक असल्याचे दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सांगितले. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अद्याप अमेरिकेलाच असून त्यातही अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये चीननंतर भारतीय विद्यार्थ्यांचाच क्रमांक लागतो.



कोरोना परिस्थितीमुळे प्रवासावर अनेक निर्बंध आल्याने भारतातून अनेक विद्यार्थी अमेरिकेत जाऊ शकले नाही. अमेरिकेतही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १३ टक्क्यांनी घटली आहे तर, एकूणात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

Indian Student numbers in USA declined due to corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात