वृत्तसंस्था
मुंबई : अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीवर टीकास्त्र सोडताना बॉलिवूडचे गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक जावेद अख्तर यांनी संघ परिवारावर देखील दुगाण्या झोडून घेतल्या होत्या. त्याला केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. Indian culture is not Taliban; Arif Mohammad Khan slapped Javed Akhtar
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट ही मध्ययुगीन, अन्यायी, स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करणारी आणि धर्मांध – हिंसक आहे, अशी टीका जावेद अख्तर यांनी केली होती. त्याच वेळी त्यांनी भारतातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल या संस्था देखील तालिबानी राजवटीत सारख्याच धर्मांध हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याची टीका करून घेतली होती. त्यावर विविध राजकीय सामाजिक नेत्यांच्या प्रतिक्रिया तर आल्याच पण सोशल मीडियावर हे जावेद अख्तर यांना भरपूर टीकेला सामोरे जावे लागले.
We don't exclude anyone. Our culture is to see everyone as "Aatma". We all are connected. I'll not say anything about Javed Akhtar's Taliban remark but just want to say that this is not our culture: Kerala Governor Arif Mohammad Khan in Mumbai pic.twitter.com/qicMIUQaA6 — ANI (@ANI) September 6, 2021
We don't exclude anyone. Our culture is to see everyone as "Aatma". We all are connected. I'll not say anything about Javed Akhtar's Taliban remark but just want to say that this is not our culture: Kerala Governor Arif Mohammad Khan in Mumbai pic.twitter.com/qicMIUQaA6
— ANI (@ANI) September 6, 2021
आरिफ मोहम्मद खान यांनी जावेद अख्तर यांचे संघ परिवाराशी तुलना तालिबानशी करणारे विधान खोडून काढले. ते म्हणाले की, भारतीय संस्कृती कोणालाही वगळत नाही. आत्मा सगळीकडे भरला आहे हे आमच्या संस्कृतीत शिकवले जाते. जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानावर मला काही म्हणायचे नाही, पण भारताची संस्कृती अजिबात तालिबान सारखी नाही एवढे मी नक्की सांगू शकतो, असा टोला देखील त्यांनी जावेद अख्तर यांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App