वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने दोन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून पाकिस्तानला गुरुवारी खडे बोल सुनावले. रवांडातील आयपीयूच्या 145 व्या सभेत राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी तर कझाकिस्तानच्या अस्तानामधील सीआयसीएच्या परिषदेत परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखींनी पाकला खडे बोल सुनावले.India warns Pakistan on international platform Harivansh and Meenakshi Lekhi to prevent terrorism
आयपीयुच्या बैठकीत हरिवंश गरजले
रवांडामध्ये होत असलेल्या आंतर-संसदीय संघ म्हणजेच आयपीयुच्या 145 व्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी या बैठकीसाठी उपस्थित असलेले राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी पाकला जोरदार प्रत्यूत्तर दिले. हरिवंश यावेळी म्हणाले की, “माझ्या देशाविरोधात खोटा आणि दूर्भावनायुक्त प्रचार करण्यासाठी आणि आजच्या चर्चेवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने या व्यासपीठाचा वापर करणे दुर्दैवी आहे.
पाकिस्तानने भारताविरोधातील दहशतवाद तातडीने थांबवला पाहिजे आणि दहशतवादाच्या संरचना बंद केल्या पाहिजे. पीओजेकेमधील मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवले पाहिजे, तसेच येथील स्थितीत कोणत्याही भौतिक बदलांवर परिणाम करणे थांबवले पाहिजे आणि आपल्या अवैध ताब्यातील भारतीय भूभाग रिकामा केला पाहिजे”
सीआयसीए परिषदेत लेखी कडाडल्या
तर दुसरीकडे कझाकिस्तानच्या अस्तानामधील सीआयसीए म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑन इंटरअॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स इन एशियाच्या परिषदेत परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखींनीही पाकला खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या की, “जम्मू-काश्मीवर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे. पाकिस्तानने दहशतवादाच्या पायाभूत संरचना बंद केल्या पाहिजे. आम्हाला पाकिस्तानसह आमच्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App